Jaipur Building Collapse: जयपूर येथील बांधकाम सुरु असलेली दुमजली इमारत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही

राजस्थान येथील जयपूर शहरातील जवाहर नगर परिसरात बांधकाम सुरु असलेली एक दुमजली इमारत कोसळली. ही घटना गुरुवार २९ ऑगस्ट रोजी घडली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ढिगाऱ्याखाली अनेक वाहने, एक ज्यूसचे दुकान आणि आणखी एक दुकान अडकले.

Jaipur Building Collapse: Photo Credit X

Jaipur Building Collapse: राजस्थान येथील जयपूर शहरातील जवाहर नगर परिसरात बांधकाम सुरु असलेली एक दुमजली इमारत कोसळली. ही घटना गुरुवार २९ ऑगस्ट रोजी घडली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ढिगाऱ्याखाली अनेक वाहने, एक ज्यूसचे दुकान आणि आणखी एक दुकान अडकले.  घटनेची तात्काळ माहिती बचावकार्याला देण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.(हेही वाचा- चर्नी रोडी येथील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली, दोन मजूरांचा मृत्यू)

माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आणि नागरी संरक्षण पथक तातडीने दाखल झाले. बचाव कार्य सुरु झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत ढिगारा हटवण्याचे प्रयत्न चालू होते. पुढील तपसीलांची प्रतिक्षा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement