Crime: दिल्लीतील मालवीय नगर परिसरात एका 25 वर्षीय तरुणाची हत्या, 5 जणांवर गुन्हा दाखल
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात गुरुवारी झालेल्या वादातून एका 25 वर्षीय तरुणाची पाच जणांनी भोसकून हत्या केली.
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात गुरुवारी झालेल्या वादातून एका 25 वर्षीय तरुणाची पाच जणांनी भोसकून हत्या केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. 11 ऑगस्ट रोजी मालवीय नगर पोलिसांना गेट क्रमांक 2जवळ एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच, एक पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हाच जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. त्यानंतर, एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून मयंक पनवार या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती मिळाली. मृताच्या मित्राने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)