Students Committed Suicide: तेलंगणामध्ये इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 6 विद्यार्थ्यांची आत्महत्या

दुसरीकडे परीक्षेचा निकाल लागल्यानंतर निजामाबादमध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Students Committed Suicide: इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तेलंगणात 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. विद्यार्थी त्यांच्या परीक्षेच्या निकालाने निराश झाले आणि त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. यासंदर्भात तेलंगणा पोलिसांनी माहिती दिली आहे. एकट्या हैदराबादमध्ये पाच आत्महत्या झाल्या आहेत. दुसरीकडे परीक्षेचा निकाल लागल्यानंतर निजामाबादमध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. परीक्षेत नापास झाल्यामुळे हताश झालेल्या विद्यार्थिनीने हैदराबादच्या वनस्थलीपुरममध्ये आत्महत्या केली. (हेही वाचा - Wife Gets Traffic Cam Pics Of Hubby With Other Woman: नवऱ्याने हेल्मेट न घालता महिला मैत्रिणीसोबत केला स्कूटरवर प्रवास, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे फोटो पाठवले बायकोच्या फोनवर)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)