Gujarat Earthquake: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात 4.1 तीव्रतेचा भूकंप, केंद्रबिंदू धोलाविराजवळ असल्याची आयएसआरची माहिती
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात शनिवारी 4.1 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. ज्याचा केंद्रबिंदू धोलाविराजवळ आहे, असे भूकंपशास्त्रीय संशोधन संस्थेने (ISR) सांगितले. मध्यम तीव्रतेच्या भूकंपामुळे मालमत्तेचे नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी दुपारी 12.08 वाजता 4.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला, ज्याचा केंद्रबिंदू कच्छमधील ढोलाविराच्या 23 किमी पूर्व-दक्षिण-पूर्व (ESE) होता. तो 6.1 किमी खोलीवर नोंदला गेला होता," गांधीनगरस्थित संस्थेने सांगितले. 4 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात 4.0 तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)