IPL Auction 2025 Live

West Bengal Heavy Rain: मुसळधार पावसामुळे 12 जणांंचा मृत्यू, पश्चिम बंगाल येथील दुर्घटना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून शोक व्यक्त

या मुसळधार पावसाने 12 जणांच्या कुटुंब उदध्वस्त केले आहे. सोमवारी रात्री येथे पावसामुळे विजेचा झटका लागून 9 जणांचा मृत्यू झाला.

Heavy Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

West Bengal Heavy Rain:  पश्चिम बंगाल राज्यात काही तासांच्या मुसळधार पाऊस होता. या मुसळधार पावसाने 12 जणांच्या कुटुंब उदध्वस्त केले आहे. सोमवारी रात्री येथे पावसामुळे विजेचा झटका लागून 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 लोक पूर्व बर्दवान, 2 पश्चिम मेदिनीपूर आणि 1 पुरुलिया येथील आहे..याशिवाय नादिया येथे भिंत कोसळल्याने दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, दक्षिण 24 परगणा येथे वादळात झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला. एका रात्रीत अवघ्या काही तासांत पावसाने 12 जणांचा मृत्यू झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल साइटवर लिहिले तसेच, पीडितांना दिलासा दिला आहे. (हेही वाचा- हुगळी येथे मुले खेळत असलेल्या तलावाजवळ भीषण स्फोट; एक ठार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)