Gold Theft Caught on Camera in Lucknow: सोन्याच्या दुकानात चोरी, बड्या चालाकीने महिलेने चोरल्या बांगड्या (Watch Video)
दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. लखनऊ येथील लूलू मॉलमधील एका सोन्याच्या दुकानात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्या महिलांच्या एका टोळक्याने कल्याण ज्वेलर्सच्या दुकानातून ४५ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या चोरल्या.
Gold Theft Caught on Camera in Lucknow: दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. लखनऊ येथील लूलू मॉलमधील एका सोन्याच्या दुकानात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्या महिलांच्या एका टोळक्याने कल्याण ज्वेलर्सच्या दुकानातून ४५ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या चोरल्या. बड्या चालाकीने दोन महिलांनी सोन्याच्या दुकानातून बांगड्या चोरल्या. ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेनंतर दुकान मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला. (हेही वाचा- पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी केला हात साफ, 25 लाख रुपयांचे दागिने लुटले, घटना CCTV कैद)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)