Vikram Gokhale Health Bulletin: अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक, डॉक्टरांकडून अजूनही प्रयत्नांची शर्थ

विक्रम गोखले यांचे मित्र राजेश दामले यांनी हेल्थ बुलेटिन देताना त्यांची प्रकृती मागील 24 तासांपासून अत्यंत चिंताजनक झाली असल्याचं म्हटलं आहे.

विक्रम गोखले । File Photo

पुण्यात दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये दाखल असलेल्या अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्या फॅमिली फ्रेंड राजेश दामले  कडून आज मीडियाला माहिती देताना विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त फेटाळत अफवांवर विश्वास ठेवू नका आणि  त्या पसरवू देखील नका असं ते म्हणाले आहेत. दरम्यान मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाल्यानंतरही सध्या डॉक्टर त्यांना उत्तम उपचार देण्याचे प्रयत्न कायम ठेवत आहेत. मागील 24 तासांत त्यांची प्रकृती गंभीर झाली असून ते व्हेंटिलेटर वर आहेत.

पहा हेल्थ बुलेटीन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement