Uorfi Javed पोलिसांच्या ताब्यात? सोशल मीडीयावरील वायरल व्हिडिओ वर नेटकर्यांच्या 'हा सारा खोटा खेळ' च्या प्रतिक्रिया (Watch Video)
उर्फी जावेदच्या विचित्र फॅशन वरून तिला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकदा ती चर्चेत असते.
फॅशन इन्फ्लुएंझर उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या अजिब फॅशन सेन्समुळे सतत चर्चेमध्ये असते. सध्या सोशल मीडीयामध्ये तिचा एक व्हिडिओ वायरल होत आहे ज्यात तिला पोलिस ताब्यात घेताना दिसत आहेत. एका कॅफेबाहेर पोलिस व्हॅन येते. एक पुरूष 2 महिला पोलिसांना उर्फीला घेऊन येण्याच्या सूचना देताना दिसत आहे. यामध्ये उर्फीची पोलिसांसोबत थोडी शाब्दिक चकमक होते. कपड्यांवरून उर्फीला ताब्यात घेतल्याचं यामधील संभाषणावरून दिसत आहे. पण सोशल मीडीयावरील हा व्हिडिओ पाहून अनेकांनी 'हा सगळा खोटा खेळ' सुरू असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)