Super Dancer Season 3: जजेसनी अल्पवयीन मुलाला विचारला आक्षेपार्ह प्रश्न; NCPCR ने केली कारवाई, सोनी पिक्चर्स नेटवर्कला सुपर डान्सर सीझन 3 चा भाग काढून टाकण्याचे आदेश

शोचे जजेस स्टेजवर एका स्पर्धकाला त्याच्या पालकांबद्दल 'अश्लील आणि लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट' प्रश्न विचारताना दिसत आहेत.

Super Dancer Season 3

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने (NCPCR) सोनी पिक्चर्स नेटवर्क्स (Sony Pictures Networks) ला एक पत्र लिहून सुपर डान्सर सीझन 3 चा एक भाग काढून टाकण्यास सांगितले आहे. सध्या मुलांचा डान्स शो 'सुपर डान्सर-चॅप्टर 3'च्या एपिसोडमधील एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शोचे जजेस स्टेजवर एका स्पर्धकाला त्याच्या पालकांबद्दल 'अश्लील आणि लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट' प्रश्न विचारताना दिसत आहेत. एनसीपीसीआरने या गोष्टीवर आक्षेप घेतला असून, आयोगाने सोनी पिक्चर्स नेटवर्क्सला हा भाग काढून पुढील 7 दिवसांत कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. (हेही वाचा: Rocky Aur Rani Ki Prem Kahani Controversy: रॉकी और रानी की प्रेम कहानी' तील 'या' आक्षेपार्ह सीनवर सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now