Sidharth Shukla च्या कुटुंबियांनी जारी केले Statement; प्रायव्हसी जपण्याची केली विनंती

सिद्धार्थ शुक्ला च्या कुटुंबियांनी अधिकृत निवदेन जारी केले असून त्यांची प्रायव्हसी जपण्याची विनंती केली आहे. तसंच मुंबई पोलिसांचे देखील आभार मानले आहेत.

Sidharth Shukla | (Photo Credits: Facebook)

सिद्धार्थ शुक्ला च्या कुटुंबियांनी अधिकृत निवदेन जारी केले असून त्यांची प्रायव्हसी जपण्याची विनंती केली आहे. तसंच मुंबई पोलिसांचे देखील आभार मानले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, "सिद्धार्थच्या संपूर्ण प्रवासाचा भाग असलेल्या आणि त्याच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञ आहोत. तो आपल्या मनात कायम राहील. सिद्धार्थ त्याच्या प्रायव्हसीला महत्त्व देत होता. त्यामुळे आमच्या (कुटुंबाच्या) प्रायव्हसीचा देखील तुम्ही आदर करा, अशी विनंती करत आहोत. तसंच मुंबई पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. ते आमच्यासोबत कायम होते. त्यांनी आम्हाला सुरक्षा प्रदान केली. कृपया सिद्धार्थबद्दलचे प्रेम कायम ठेवा. ओम शांती. शुक्ला फॅमेली."

Sidharth Shukla’s Family Statement (Photo Credits: Twitter)

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement