IPC Marathi Web Series Trailer Out: सत्य घटनांवर आधारित मराठी वेब सीरिज 'आयपीसी'चा थ्रिलर मर्डर मिस्ट्री ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ
या वेब सीरिजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, राजेंद्र शिसातकर, सुरेश विश्वकर्मा, अभेनी सावंत यांच्या भूमिका आहेत.
IPC Marathi Web Series Trailer Out: सत्य घटनांवर आधारित मराठी वेब सीरिज 'आयपीसी'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजची निर्मिती कोकणातील एका छोट्या गावात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित करण्यात आली आहे. आयपीसी वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट्रा झाकास वर प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सीरिजमध्ये कायदेशीर व्यवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला असून दररोज घडणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणांवर भाष्य करण्यात आलं आहे. या वेब सीरिजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, राजेंद्र शिसातकर, सुरेश विश्वकर्मा, अभेनी सावंत यांच्या भूमिका आहेत. या सीरिजचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केले आहे. 25 ऑक्टोबरला अल्ट्रा झकासवरआयपीसी वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.
सत्य घटनांवर आधारित मराठी वेब सीरिज 'आयपीसी'चा थ्रिलर प्रदर्शित -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)