KBC 15 Promo: केबीसी 15 नव्या बदलांसह येणार रसिकांच्या भेटीला; Amitabh Bachchan यांनी दिली हिंट (Watch Video)
फक्त तिसरा सीझन शाहरुख खानने होस्ट केला होता.
बिग बी अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' चा 15 वा सीझन घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. केबीसी 15 चा नवा प्रोमो आता समोर आला आहे. यामध्ये भारत बदलत आहे तर मग केबीसी कसा मागे राहेल? केबीसी देखील नव्या बदलांसह नव्या अंदाजात लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. केबीसी 15 साठी एप्रिल महिन्यात रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलं होतं आता पुढील महिन्यापासून शो साठी शूटिंग देखील सुरू होइल असा अंदाज आहे. दरम्यान हा नवा शो टेक्नॉ सॅव्ही अंदाजात असेल असे सांगण्यात आले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)