Kavita Kaushik Quits TV Industry: लोकप्रिय अभिनेत्री कविता कौशिकने टीव्ही इंडस्ट्रीला ठोकला रामराम; जाणून घ्या काय आहे कारण

आता 23 वर्षे छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर कविता कौशिकने टीव्ही इंडस्ट्रीला राम राम ठोकला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कविता कौशिकने सांगितले की, तिने टीव्ही सोडला आहे.

Kavita Kaushik Quits TV Industry

Kavita Kaushik Quits TV Industry: ‘कुटुंब' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री कविता कौशिकने अनेक टीव्ही शोमध्ये विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. एकता कपूरचा सुपरहिट शो 'कहानी घर घर की' यासह 'कोई अपना सा', 'पिया का घर' अशा अनेक डेली सोपमध्ये ती दिसली होती. 'एफआयआर' या कॉमेडी शोमधून कविताला ‘चंद्रमुखी चौटाला’द्वारे विशेष प्रसिद्धी मिळाली. आता 23 वर्षे छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर कविता कौशिकने टीव्ही इंडस्ट्रीला राम राम ठोकला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कविता कौशिकने सांगितले की, तिने टीव्ही सोडला आहे. तिला सतत खलनायक भूमिका ऑफर केल्या जात होत्या, त्यामुळे ती वैतागली होती. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कविता म्हणाली- मला टीव्ही करायचा नाही. मी वेब सिरीज आणि चित्रपट करायला तयार आहे. कविता कौशिकने टीव्ही कंटेंटबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, ‘टीव्ही कंटेंटही खूप मागास-विचाराचा बनला आहे. त्यामुळे मला त्याचा भाग व्हायचे नाही.’ (हेही वाचा: Bigg Boss OTT 3 विरोधात अश्लीलतेची तक्रार, शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली)

पहा पोस्ट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement