Baby Girija Dies: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री बेबी गिरिजा यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन; चेन्नईत घेतला अखेरचा श्वास

गिरिजाने 1950 च्या दशकापासून मल्याळम चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले. अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. विशेषत: जिविथा नौका या क्लासिक चित्रपटातील तिची भूमिका खूप गाजली.

Baby Girija (PC - X/@mathrubhumieng)

Baby Girija Dies: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री बेबी गिरिजा (Baby Girija) यांचे निधन झाले आहे. गिरिजा यांनी 11 मे रोजी चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या 83 वर्षांच्या होत्या. गिरिजाने 1950 च्या दशकापासून मल्याळम चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले. अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. विशेषत: जिविथा नौका या क्लासिक चित्रपटातील तिची भूमिका खूप गाजली. त्यानंतरच्या काही वर्षांत, बेबी गिरिजाने ‘अचन’, ‘विशापिंडे विली’, ‘प्रेमलेखा’, ‘अवान वरुणू’ आणि ‘पुथरा धर्मम’ यासह अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now