Bigg Boss Winner Suraj Chavan Meet Ajit Pawar: सूरज चव्हाणने घेतली अजित पवार यांची भेट; उपमुख्यमंत्र्यांकडून सूरजला घर गिफ्ट

बिग बॉसच्या घरातच सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचं सांगितलं होतं

Photo Credit - Ajit Pawar X Account

बिग बॉसची ट्रॉफी (Bigg Boss) घेऊन सूरज चव्हाण (Suraj Chavhan) याने मुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. अजित पवारांनी यावेळी सूरज चव्हाण घराचीही भेट दिली आहे. गावात नवीन जागा घेऊन त्याला घर बांधून द्या अशा सूचना अजित पवारांनी फोनवरुन दिल्या आहेत. यावेळी अजित पवारांनी सूरजच्या घराच्यांचीही चौकशी केली. बिग बॉस जिंकल्यानंतर सुरजला भेटण्यासाठी पवारांनी संपर्क साधला होता. परंतू ते त्यावेळी शक्य झाले नाही यामुळे दोघांची भेट आज झाली.

दरम्यान बिग बॉसच्या घरातच सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचं सांगितलं होतं तसेच पंढरीनाथ कांबळेनी देखील त्याचे पालकत्व स्विकारले आहे.

पाहा फोटो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now