बिग बॉस ओटीटी विजेता Elvish Yadav च्या अडचणीमध्ये वाढ; कोर्टाने दिले FIR दाखल करण्याचे आदेश, जाणून घ्या काय आहे प्रकरण
गुरुग्राम न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना एल्विश आणि राहुल फाजिलपुरिया यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव आणि बॉलीवूड गायक राहुल यादव फाजिलपुरियाचा यांचा त्रास संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. एल्विश यादवला दोन जुन्या खटल्यांमध्ये नोएडा आणि गुरुग्राम कोर्टातून जामीन मिळाला असला तरी, आता त्याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार आहेत. गुरुग्राम न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना एल्विश आणि राहुल फाजिलपुरिया यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. एका याचिकेची दखल घेत गुरुग्राममधील एसीजेएम मनोज राणा यांच्या न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. पीपल फॉर ॲनिमल्स या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने सौरव गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये गाण्याच्या शूटिंगदरम्यान दुर्मिळ प्रजातीच्या सापांचा बेकायदेशीरपणे वापर करण्यात आला. न्यायालयाचा आदेश मिळताच बादशाहपूर पोलीस ठाण्यात ही एफआयआर नोंदवण्यात येणार आहे. (हेही वाचा: Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनचा पत्नी आलियासोबतचा वाद मिटला, मुलांसाठी आले एकत्र)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)