Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या घरात धक्काबुक्की? करन्सी वाद प्रकरण टोकाला (Watch Video)
कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये भलताच गोधळ पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ बिगबॉसच्या घरामधील असून स्पर्धकांमध्ये तीव्र वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. काही स्पर्धक परस्परांवर धावून जात आहेत. तर काहींनी मारहाण केल्याचा दावा केला आहे.
बिग बॉस मराठी 5 सुरु होऊन काहीच दिवस झाले आहेत. कसाबसा पहिला आठवडा पूर्ण झाला. पहिला आठवडा काही घडामडी वगळता भलताच मिळमिळीत गेला. परिणामी साप्तहिक फेरीदरम्यान, होस्ट रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावरुन स्पर्धकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यामुळे काही स्पर्धक जाणीव झाल्याने तर काही स्पर्धक उसणे का होईना पण अवसान आणून राडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये भलताच गोधळ पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ बिगबॉसच्या घरामधील असून स्पर्धकांमध्ये तीव्र वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. काही स्पर्धक परस्परांवर धावून जात आहेत. तर काहींनी मारहाण केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आज (5 ऑगस्ट) प्रसारित होणाऱ्या भागात नेमका राडा कशामुळे झाला आणि नेमके घडले काय? याबाबत माहिती मिळू शकते. दरम्यान, करन्सीवरुन हा वाद रंगल्याची प्राथमिक माहिती आहे. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी'च्या घरामधून कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर)
व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2024 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

