'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौतम बुद्धांचा अपमान; महेश कोठारे यांनी मागितली जाहीर माफी (Watch Video)
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर महेश कोठारे यांची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सुरु आहे. मालिकेला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर महेश कोठारे यांची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सुरु आहे. मालिकेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 14 सप्टेंबरच्या भागामध्ये या मालिकेतील एक पात्र सँडी नावाच्या एका महिला पात्रासाठी, एक निळ्या रंगाचा ब्लाऊज देण्यात आला होता त्यावर पांढर्या रंगामध्ये तथागत गाौतम बुद्धांचे चित्र छापण्यात आलेले होते. अंतवस्त्रामध्ये गणना होणार्या ब्लॉऊजवर गौतम बुद्धांचे चित्र पाहून वाहिनीचे संचालक, निर्माते आणि ड्रेस डिझायनर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली होती.
आता या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल सर्वांची जाहीर माफी मागितली आहे. सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत कोठारे यांनी ही अनवधानाने घडलेली चूक असून ती पुन्हा होणार नाही अशी ग्वाही दिली आहे.
महेश कोठारे यांनी मागितली माफी -