The Elephant Whisperers: ऑस्कर जिंकल्यानंतर शेफ विकास खन्ना यांनी गुनीत मोंगाचे अमृतसर विमानतळावर केले स्वागत
सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना आणि त्यांच्या आईने अमृतसर विमानतळावर निर्मात्या गुनीत मोंगाचे स्वागत करत त्यांना मिठाई देखील भरवली.
द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers) या डॉक्यूमेंटरीने 95 व्या ऑस्कर पुरस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी हा पुरस्कार पटकावला होता. या डॉक्युमेंटरीच्या निर्मात्या गुनीत मोंगा (Guneet Monga) यांचे अमृतसरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना (chef Vikas Khanna) आणि त्यांच्या आईने अमृतसर विमानतळावर निर्मात्या गुनीत मोंगाचे स्वागत करत त्यांना मिठाई देखील भरवली. शेफ विकास खन्ना आणि गुनीत मोंगा हे चांगले मित्र आहेत. विमानतळावरील स्वागतानंतर गुनीत मोंगा यांनी गोल्डन टेंमललाही भेट दिली.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)