Shardha Sinha Health Update: प्रसिद्ध लोकगायिका श्रद्धा सिन्हा ऑक्सिजन सपोर्टवर, कर्करोगाशी देत आहे झुंज

प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा कॅन्सरमुळे ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. एम्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 72 वर्षीय शारदा सिन्हा यांना 2017 पासून मल्टीपल मायलोमा नावाच्या कॅन्सरने ग्रासले आहे आणि सध्या त्यांना एम्सच्या इन्स्टिट्यूट रोटरी कॅन्सर हॉस्पिटल (IRCH) च्या ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. एम्स मीडिया सेलच्या प्रभारी प्रोफेसर रीमा म्हणाल्या, "शारदा सिन्हा यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु त्या डॉक्टरांच्या सतत निरीक्षणाखाली आहेत."

Shardha Sinha Health Update

Shardha Sinha Health Update: प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा कॅन्सरमुळे ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. एम्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 72 वर्षीय शारदा सिन्हा यांना 2017 पासून मल्टीपल मायलोमा नावाच्या कॅन्सरने ग्रासले आहे आणि सध्या त्यांना एम्सच्या इन्स्टिट्यूट रोटरी कॅन्सर हॉस्पिटल (IRCH) च्या ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. एम्स मीडिया सेलच्या प्रभारी प्रोफेसर रीमा म्हणाल्या, "शारदा सिन्हा यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु त्या डॉक्टरांच्या सतत निरीक्षणाखाली आहेत." अलीकडेच शारदा सिन्हा यांनी त्यांचे पती ब्रज किशोर सिन्हा गमावले, त्यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले होते. मैथिली, भोजपुरी आणि माघी भाषेत गायलेली त्यांची लोकगीते प्रत्येक घरात विशेषत: छठच्या सणात वाजवली जातात. पद्मभूषण पुरस्कार विजेत्या शारदा सिन्हा यांनी 'गँग्स ऑफ वासेपूर-2', 'हम आपके है कौन' आणि 'मैने प्यार किया' सारख्या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत.

ऑक्सिजन सपोर्टवर प्रसिद्ध लोकगायिका श्रद्धा सिन्हा:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement