Rajkumar Kohli Passes Away: लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार कोहली याचं निधन, वयाच्या ९५ वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली यांचे निधन झाले आहे. ते ९५ वर्षाचे होते.
Rajkumar Kohli Passes Away: बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली यांचे निधन झाले आहे. ते 95 वर्षाचे होते. माहितीनुसार, राजकुमार यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आले आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राजकुमार कोहली आज सकाळी अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले होते. पण उशिरापर्यंत ते बाहेर न झाल्याने तसेच त्यांचा काही आवाजही न आल्याने त्यांचा मुलगा अरमान कोहलीने दरवाजा तोडला आणि वडिलांना बाहेर काढलं. तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. नागिन, जानी दुश्मन, जानी दुश्मन: एक अनोखी कहानी, पतनी और तवैफ, बदले की आग, नौकर बीवी का अश्या अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार कोहली यांनी केलं होतं