Jersey New Trailer Release: शाहिद कपूरच्या 'जर्सी' चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रदर्शित, 14 एप्रिलला चित्रपटगृहात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कोविडमुळे चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा चित्रपट 14 एप्रिलला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Jersey Cinema (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) 'जर्सी'ची (Jersey) चाहत्यांनी बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहिली आहे. 'कबीर सिंग'च्या यशानंतर चाहत्यांना त्याचा नवा अवतार पुन्हा पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे. ही प्रतीक्षाही 'जर्सी'ने संपताना दिसत आहे. आता या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा नवा आणि दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. तसेच या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. कोविडमुळे चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा चित्रपट 14 एप्रिलला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement