लैंगिक छळ प्रकरणात 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' मालिकेचे निर्माते Asit Modi यांना धक्का, खटल्याचा निकाल Jennifer Mistry यांच्या बाजूने

तारक मेहता का उल्टा चष्मा या हिट शोमध्ये मिसेस सोधीची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने २०२३ मध्ये निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता, जाणून घ्या अधिक माहिती

Jennifer Mistry and Asit Modi (Photo: Insta /twitter)

Jennifer Mistry Wins Against Asit Modi: तारक मेहता का उल्टा चष्मा या हिट शोमध्ये मिसेस सोधीची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने २०२३ मध्ये निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. ताज्या अपडेटनुसार, जेनिफरने केस जिंकली आहे. शिवाय, न्यायालयाने निर्मात्याला अभिनेत्रीला 25 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत, ज्यात लैंगिक छळाचे आरोप तसेच शोमधील तिची देणी यांचा समावेश आहे.

जेनिफरने प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्यावर शोच्या सेटवर तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोपही केला होता. 2013 च्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा अंतर्गत असित दोषी आढळला असला तरी सोहेल आणि जतीन यांना कोणतीही शिक्षा देण्यात आलेली नाही.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Entertainment TV (@entertainment_tvofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)