Shantit Kranti Season 2 Official Trailer: शांती क्रांती सीझन 2 चा अधिकृत ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)
शांतीत क्रांती-2 चा ऑफिशिअल ट्रेलर पाहिला नसेल तर तो इथे पाहू शकता. भाडीपने आपल्या भारतीय डिजिटल पार्टी या युट्युब चॅनलवर हा ट्रेलर लॉन्च केला आहे.
भाडिपच्या शांतीत क्रांती सिरीजचा भाग दोन येत आहे. नुकताच त्याचा एक ट्रेलर युट्युबवर लॉन्च झाला आहे. या आधीच्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागालाही नेटीझन्सचा प्रतिसाद लाभेल अशी चर्चा आहे. भाग दोनमध्ये आलोक राजवाडे, अभय महाजन, ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, प्रियदर्शनी इंदलकर, प्रिया बनर्जी, उमेश जगताप, सागर यादव यांच्यासह आणखी काही स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. आपणही शांतीत क्रांती-2 चा ऑफिशिअल ट्रेलर पाहिला नसेल तर तो इथे पाहू शकता. भाडीपने आपल्या भारतीय डिजिटल पार्टी या युट्युब चॅनलवर हा ट्रेलर लॉन्च केला आहे. लॉन्च करताना भाडीपाने म्हटले आहे की, ''मंडळी तुमचे आवडते त्रिकुट परत येतंय तुमच्या भेटीला आणि ते पण डब्बल मज्जा आणि मस्ती सकट. आता हा प्रवास होणार आहे अजून धमाकेदार.तर तयार रहा एक कडक प्रवासा साठी!''
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)