Sairat Complete 8 Years: नागराज मंजुळेच्या 'सैराट'ला 8 वर्षं पूर्ण; रिंकू राजगूरूने शेअर केली खास पोस्ट
अजय-अतुल या संगीत दिग्दर्शक जोडीने संगीतबद्ध केलेली सगळी गाणी सुपरहिट झाली होती. आजही ही गाणी महाराष्ट्रात सुपरहिट आहेत.
सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 110 करोड रुपयांचं कलेक्शन करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आणि नुकतीच या सिनेमाला 8 वर्षं पूर्ण झाली. अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतंच सैराटला आठ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या सिनेमातील भूमिकेसाठी रिंकूला तिच्या उत्तम अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तर बॉलिवूडकरांचंही या सिनेमाने लक्ष वेधून घेतलं होतं.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)