Ramesh Deo Passes Away: चित्रपटसृष्टीवर शोककळा; जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दिग्गज अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे

Ramesh Deo Passes Away (संग्रहित संपादित प्रतिमा)

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमधील जेष्ठ व दिग्गज अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारणारे रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अभिनेत्री सीमा देव या त्यांच्या पत्नी, तर अभिनेता अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव हे त्यांचे पुत्र आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement