Prajakta Mali Saree Photos: लाल रंगाची नऊवारी साडी आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये खुलले प्राजक्ता माळीचे सौंदर्य; नवे फोटोशूट व्हायरल (See Photos)

अभिनय कौशल्याबरोबरच, प्राजक्ता माळीने आपल्या नृत्यकौशल्याने आणि उद्योजकतेने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.​ प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असून, त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर 2 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Prajakta Mali Saree Photos

प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री, नृत्यांगना आणि उद्योजिका आहे. अभिनयाशिवाय प्राजक्ता 'प्राजक्तराज' नावाचा ज्वेलरी ब्रँडही चालवते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तिने या ब्रँडची वेबसाईटही सुरू केली आहे. यासाठी प्राजक्ताने लाल रंगाच्या नऊवारी साडी आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये एक खास फोटोशूट केले. यासाठी तिने आपल्या ब्रँडचे दागिने परिधान केले आहेत. सध्या हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो शेअर करताना प्राजक्ता लिहिते, ‘हे अलंकार सोन्याचे नाहीत. होय. तांब्याच्या धातूत बनवलेले आणि सोन्याची झळाळी दिलेले आहेत. सगळ्यांना इमिटेशन फॉर्ममध्ये उत्तम गुणवत्ता असलेले मराठी अलंकार रास्त दरात उपलब्ध व्हावेत, यासाठीच प्राजक्तराज प्रयत्नशील आहे.’

अभिनय कौशल्याबरोबरच, प्राजक्ता माळीने आपल्या नृत्यकौशल्याने आणि उद्योजकतेने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.​ प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असून, त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर 2 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (हेही वाचा: Ye Re Ye Re Paisa 3 Teaser: संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडीत चा धमाकेदार 'येरे येरे पैसा 3' टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला)

Prajakta Mali Saree Photos:

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement