Poshter Boyz - 2: पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'पोश्टर बॉईज 2'; ढोल ताशाच्या गजरात पोस्टरचे अनावरण

अजय मयेकर दिग्दर्शित 'आले रे पोश्टर बॉईज 2' (Poshter Boyz - 2) या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' अशी टॅगलाईन असुन पोस्टरचे अनावरन करण्या आले आहे.

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पोश्टर बॉईज'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळेच चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय मयेकर दिग्दर्शित 'आले रे पोश्टर बॉईज 2' (Poshter Boyz - 2) या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar), हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) आणि अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwas Rao) हे बॉईज पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या 25 फूट पोस्टरचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसर यावेळी गर्दीने गजबजलेला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now