दिराच्या लग्नात अभिनेत्री मानसी नाईक हीचा मनमोहक मराठमोळा लुक, उखाणा लिहित शेअर केले फोटो
ज्यात तिने सुंदर अशी पैठनी नेसली असून ती अगदी मराठमोळ्या रुपात पहायला मिळत आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील गोष्टींबद्दल बऱ्याच गोष्टी कळवत असतात. याच कलाकारांच्या यादीत अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) हीचा ही समावेश आहे. मानसी ही सोशल मिडीयावर खुप सक्रीय असते. काही महिन्यांपूर्वीच मानसी तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न बंधनात अडकली होती. मानसीने नुकतेच काही फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. ज्यात तिने सुंदर अशी पैठनी नेसली असून ती अगदी मराठमोळ्या रुपात पहायला मिळत आहे. मानसी तिच्या दिराच्या लग्नासाठी एवढी नटली आहे. तिने त्या फोटोंना कॅप्शन देत एक उखाना लिहिला आणि त्याच बरोबर Ready For , JETH Ki Shaadi असेही लिहिले आहे. पहा मानसीचे फोटो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)