IndieWire’ Annual Critics Poll: 2021 च्या 50 सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी जाहीर; चैतन्य ताम्हाणेचा The Disciple या एकमेव भारतीय चित्रपटाला मिळाले स्थान

IndieWire’ Annual Critics Poll: 2021 च्या 50 सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी जाहीर

The Disciple (PC - You Tube)

चैतन्य ताम्हाणे याने लिहिलेल्या, दिग्दर्शित आणि संपादित केलेल्या The Disciple ला FIPRESCI आंतरराष्ट्रीय समीक्षक पुरस्कार आणि व्हेनिस येथे सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार मिळाला आहे. हा मराठी चित्रपट यावर्षी 30 एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या स्ट्रीमिंग जाईंटवर प्रदर्शित झाला. आता IndieWire ने त्यांचे वार्षिक समीक्षक सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे आणि 2021 च्या 50 सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीमध्ये फक्त The Disciple हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.

आदित्य मोडक, सुमित्रा भावे, अरुण द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने यादीमध्ये 26 वे स्थान पटकावले आहे. जेन कॅम्पियनचा द पॉवर ऑफ द डॉग हा पोलमध्ये अव्वल ठरलेला चित्रपट आहे. ड्राईव्ह माय कार, फ्ली, बेलफास्ट, द वेल्वेट अंडरग्राउंड आणि इतर चित्रपटांचा या यादीत समावेश आहे. 187 चित्रपट समीक्षकांच्या मतानुसार हे विजेते निवडले गेले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now