Dharmaveer 2 Release Date: 'धर्मवीर 2' ची नवी रीलीज डेट जाहीर; 27 सप्टेंबरला सिनेमा होणार प्रदर्शित

प्रविण तरडे दिग्दर्शित हा सिनेमा मागील महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थितीमुळे आणि जोरदार पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आला होता.

Dharmaveer 2 | Instagram

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'धर्मवीर 2' सिनेमाची आता नवी रीलीज डेट जाहीर झाली आहे. पूर्वी 9 ऑगस्टला रीलीज होणारा हा सिनेमा आता 27 सप्टेंबरला रीलीज होणार आहे. धर्मवीर च्या पहिल्या भागाला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसर्‍या भागाची प्रतिक्षा आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित हा सिनेमा मागील महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थितीमुळे आणि जोरदार पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आला होता. आज स्वातंत्र्यदिनी सिनेमाची नवी रीलीज डेट समोर आली आहे. नक्की वाचा: Dharmaveer 2 Trailer: 'धर्मवीर-2' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; आनंद दिघेंच्या मृत्यूचं गुढ उकलणार? 

धर्मवीर 2 रीलीज डेट

View this post on Instagram

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now