De Dhakka 2 Trailer: 'काय झाडी, काय डोंगर'चा डाॅयलाग घुमणार 'दे धक्का 2' मध्ये, धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकाच्या भेटीला

हा सिनेमा निखळ मनोरंजन देणारा असणार याची खात्री ट्रेलरमधून येताना दिसत आहे. हा चित्रपट 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे

De Dhakka 2

मकरंद जाधव आणि कुटुंबीय त्यांच्या जुन्या धमाल अंदाजात पुन्हा भेटीला येणार आहेत. 'दे धक्का 2' (De Dhakka 2 Trailer) चा ट्रेलर रिलीज झाला असुन या चित्रपटातील सगळ कथानक आता राणीच्या देशात म्हणजे लंडनमध्ये दिसणार आहे. सध्या या ट्रेलरला बरीच पसंती मिळताना दिसत आहे. या सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यामुळे दुसऱ्या भागात नेमकं काय बघायला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. हा सिनेमा निखळ मनोरंजन देणारा असणार याची खात्री ट्रेलरमधून येताना दिसत आहे. हा चित्रपट 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement