Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या सेटवर आज 'खेल खेल मैं'ची टीम लावणार हजेरी, अक्षय देणार स्पर्धकांना सल्ला
'खेल खेल मैं' चित्रपटानिमित्त 'भाऊचा धक्का'वर खास बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटाची टीमही उपस्थित राहणार आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. शनिवार आणि रविवारी बिग बॉसच्या घरात 'भाऊचा धक्का' असतो. यावेळी रितेश देशमुख स्पर्धकांचा चांगलाच क्लास घेतो. सध्या प्रेक्षकांमध्ये 'भाऊचा धक्का'ची जोरदार चर्चा सुरू आहे. आजचा एपिसोड फक्त प्रेक्षकांसाठीच नाही तर, स्पर्धकांसाठीही खास असणार आहे. कारण आहे, आजच्या 'बिग बॉस मराठी'च्या एपिसोडमध्ये 'खेल खेल मैं' चित्रपटाची टीम उपस्थित राहणार आहे. (हेही वाचा - Bigg Boss Marathi 5: अभिजीतला 'बांगड्या घाल' म्हणणं जान्हवीला पडणार भारी; रितेश देशमुखे दिली घरा बाहेर काढण्याची धमकी)
'खेल खेल मैं' चित्रपटानिमित्त 'भाऊचा धक्का'वर खास बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटाची टीमही उपस्थित राहणार आहे. नुकताच कलर्स मराठीकडून आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यावेळी खिलाडी यांनी स्पर्धकांशी मराठीत संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी स्पर्धकांना खास सल्ला देखील दिला.
पाहा व्हिडिओ -
प्रोमोमध्ये अक्षय कुमार वर्षा उसगांवकर ह्यांना म्हणतो, "वर्षा किती वर्षांनी दिसतेस" अक्षयच्या प्रश्नावर वर्षाताईंच्या चेहऱ्यावर हास्य येते. त्यानंतर अक्षय कुमार डीपीला विचारतो,"घरात मटन मिळतंय की नाही ?" त्यानंतर सूरजच्या स्टाईलने भाऊच्या धक्क्यावर सूरज चव्हाण, रितेश देशमुख आणि खिलाडी कुमार झापुक झुपुक थिरकताना दिसतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)