Gaurav More on MHJ Show: गौरव मोरेचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला रामराम, पोस्ट करत दिली माहिती
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने अभिनेता गौरव मोरेला महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी दिली आहे. ‘गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ त्याच्या ह्या हटक्या डायलॉगने गौरव मोरेला विशेष ओळख दिली आहे.
गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांने लिहले आहे की " Hello everyone i am a gaurav more from powai filter pada Ta na na na na naaaaaa आरा बाप मारतो का काय मी… ये बच्ची... रसिक प्रेक्षक आपण ह्या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहे. मला सांगताना खूप वाईट वाटतंय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्यजत्रा” मधून आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो. "
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)