Kesari Chapter 2 Box Office Collection Day 3: 'केसरी चॅप्टर 2' ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद; आत्तापर्यंत 'इतक्या' कोटींची कमाई
अक्षय कुमार स्टारर 'केसरी चॅप्टर 2' ने रिलीजच्या तीन दिवसात चांगली कामगरी केली आहे. शुक्रवारी या चित्रपटाने 7.84 कोटी रुपये कमावले होते. आत्तापर्यंत चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे.
Kesari Chapter 2 Box Office Collection Day 3: अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर 'केसरी चॅप्टर 2' (Kesari Chapter 2) ने शुक्रवारी संथ कमाईने केलेल्या सुरुवातीनंतर आता वेग घेतला आहे. शुक्रवारी या चित्रपटाने 7.84 कोटी रुपये कमावले होते. शनिवारी त्यांच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. आणि चित्रपटाने 10.08 कोटी रुपये कमावले. त्यानंतर रविवारी या चित्रपटाने 11.70 कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे, आठवड्याच्या शेवटी चित्रपटाची एकूण कमाई 29.62 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे गुड फ्रायडेसारख्या सुट्टीच्या दिवशीही चित्रपटाला रविवारी प्रतिसाद मिळाला मुंबई, दिल्ली-एनसीआर, पुणे आणि बेंगळुरू सारख्या मेट्रो शहरांमध्ये मल्टीप्लेक्स आणि प्रीमियम स्क्रीनवर या चित्रपटाने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच वेळी, रविवारी कोलकाता, लखनौ, भोपाळ, हैदराबाद, चंदीगड आणि अहमदाबाद सारख्या अनेक शहरांमध्येही चांगली वाढ दिसून आली. आता सर्वांच्या नजरा सोमवारच्या कमाईवर आहेत. जी चित्रपटासाठी 'मेक किंवा ब्रेक' ठरू शकते. 1 मे पूर्वी कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने या चित्रपटाला कमाईची मोठी संधी आहे.
'केसरी चॅप्टर 2' ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)