Bhool Bhulaiyaa 3: 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनचे हावडा ब्रिजवरील फोटो लिक
कार्तिक आर्यन सध्या 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कोलकातामधील हावडा ब्रिजवर चित्रपटाचे शूटींग सुरू असतानाचे काही फोटो लिक झाले आहेत.
Bhool Bhulaiyaa 3: कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) 'भूल भुलैया 3'च्या शूटिंगसाठी सध्या कोलकाता(Kolkata)मध्ये आहे. चित्रपटात तो रुहान रंधावा उर्फ रूह बाबाची भूमीका साकारत आहे. त्यासाठी त्याने काळ्या रंगाचे कपडे, कपाळावर भस्म, गळ्यात ऋद्राक्षांची माळ यासर्व गोष्टी परिधान केल्या आहेत. या सर्व वेशभूषेत तो हावडा ब्रिज (Howrah Bridge)वर शूटींग करताना दिसला. पहाटेच्या वेळी, हावडा ब्रिजवर गर्दीतून वाट काढत बाईकवरून जातानाचा सीन चित्रीत करताना टी २ या वृत्तसंस्थेने त्याचे फोटो शेअर केले आहेत. (हेही वाचा :WPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्याला लागणार बॉलिवूडचा तडका, Karthik Aaryan, Siddharth Malhotra आणि Tiger Shroff प्रेक्षकांना भुरळ घालणार )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)