The Incarnation Sita: अभिनेत्री Kangana Ranaut साकारणार रूपेरी पडद्यावर 'सीता'; पोस्टर शेअर करत दिली माहिती
कंगना रनौत पूर्वी रूपेरी पडद्यावर सीता माईची भूमिका करिना कपूर खान साकारणार असल्याची देखील चर्चा रंगली होती. अलौकिक देसाई या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
The Incarnation Sita या आगामी सिनेमामध्ये अभिनेत्री Kangana Ranaut रूपेरी पडद्यावर 'सीता'माईची भूमिका साकारणार आहे. आज सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करत माहिती देण्यात आली आहे. इंस्टाग्राम वर पोस्टर शेअर करताना कंगनाने 'अत्यंत चांगल्या, हुशार टीम सोबत काम करत असल्याचा तसेच मुख्य भूमिका साकरत असल्याचा आनंद आहे. राम - सीता यांचा आशिर्वाद आहे. जय श्री राम' असं कॅप्शन दिलं आहे.
The Incarnation Sita पोस्टर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)