Vir Das To Host International Emmy Awards: कॉमेडियन वीर दास होस्ट करणार यंदाचा प्रतिष्ठित इंटरनॅशनल एमी अवॉर्ड; ठरला पहिला भारतीय

एमी अवॉर्ड्सचे होस्टिंग करणारा वीर पहिला भारतीय ठरला आहे. इंटरनॅशनल ॲकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसने वीरला 2024 इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स होस्ट म्हणून घोषित केले आहे.

Vir Das (Photo Credit: Instagram @virdas)

Vir Das To Host International Emmy Awards: कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या तो अनन्या पांडेच्या 'कॉल मी बे' या कॉमेडी वेब सीरिजमध्ये दिसत आहे. आता वीर अजून एका कारणाने प्रकाशझोतात आला आहे. वीर दास 52 वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार होस्ट करणार आहे. एमी अवॉर्ड्सचे होस्टिंग करणारा वीर पहिला भारतीय ठरला आहे. इंटरनॅशनल ॲकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसने वीरला 2024 इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स होस्ट म्हणून घोषित केले आहे. हा केवळ वीरच्याच कारकिर्दीसाठी मैलाचा दगड ठरणार नाही, तर भारतीयांसाठीही निश्चितच अभिमानाचा विषय ठरेल. 25 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क शहरात हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्सच्या 51 व्या आवृत्तीत वीरला त्याचा नेटफ्लिक्स शो ' वीर दास: लँडिंग'साठी सर्वोत्कृष्ट विनोदी श्रेणीमध्ये एमी पुरस्कार देखील मिळाला होता. वीर हा 2017 मध्ये 32 देश आणि सहा खंडांना भेट देऊन जागतिक दौऱ्यावर जाणारा पहिला विनोदी अभिनेता आहे. कॉमेडी व्यतिरिक्त वीर दास एक निर्माता देखील आहे. अनेक मालिकांमध्येही तो दिसला आहे. तो नेटफ्लिक्सच्या 'हसमुख' आणि प्राइम व्हिडिओच्या जेस्टिनेशन अननोनमध्ये दिसला आहे. वीर दास हा कॉमेडी-रॉक बँड एलियन चटनीचा मुख्य गायक देखील आहे. (हेही वाचा: Ramayana: रामायणात रणबीर कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार, प्रभू राम आणि परशुराम यांची भूमिका साकारणार)

कॉमेडियन वीर दास होस्ट करणार यंदाचा प्रतिष्ठित इंटरनॅशनल एमी अवॉर्ड-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now