Holi 2024: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची होळी पाहून येईल हसू, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या त्यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी आज होळीच्या दिवशी या दोन्ही स्टार्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, पाहा व्हिडीओ
Holi 2024: बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या त्यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी आज होळीच्या दिवशी या दोन्ही स्टार्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अक्षय कुमारने होळीचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार त्याच्या बंगल्यातून बाहेर पडताना दिसत आहे. त्याचवेळी त्याची वाट पाहत असलेला टायगर श्रॉफ रंगीत पाण्याने भरलेली बादली अक्षय कुमारवर फेकणार होता, तेव्हा तो त्याच्यावर नारळाने हल्ला करण्याच्या तयारीत होता, आता टायगरने रंगीत पाण्याने भरलेली बादली स्वतःवर ओतली.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)