Gauahar Khan: "तुम्ही आधी निट बोलायला शिका", शैतानच्या स्क्रिनिंगदरम्यान गौहर खान पापाराझीवर भडकली; पाहा व्हिडीओ
ज्यात ती पापाराझीवर चिडलेली दिसत आहे. नेटकऱ्यांनीही त्यावर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत.
Gauahar Khan: अजय देवगवन (Ajay Devgn) आणि आर. माधवनचा (R. Madhavan) शैतान (Shaitaan)चित्रपट रिलीज झाला आहे. 7 मार्चला या चित्रपटाच स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं. या स्क्रिनिंगवेळी अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) पापाराझींवर चिडलेली दिसली. गौहरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौहर स्क्रिनिंगवेळी लाल रंगाच्या फ्लेर्ड ड्रेस आणि मोकळे केस अशा लूकमध्ये तिथे आली होती. ती कॅमेऱ्यासाठी पोज देत असताना पापाराझींनी ओरडायला सुरुवात केली. तेव्हा चिडून "तुम्ही असं का बोलत आहात?तुम्ही आधी निट बोलायला शिका", असं थेट ती पापाराझींनी म्हणाली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी भंन्नाट कमेंट्स करत, "पापाराझी नक्की तिला काय म्हणाले?" "मॅडमला खूपच राग आला आहे" अशा प्रतिक्रीया दिल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)