Fighter on Netflix: थिएटरमध्ये चांगली कमाईनंतर हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फाइटर' चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज
ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण 'फाइटर'ने चांगली कमाई केली आहे. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता सिनेमाने ओटीटीकडे वाटचाल केली आहे. आता चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
Fighter on Netflix: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फाइटर' (Fighter) ओटीटीवर रिलीज झाला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतीय हवाई दल आपला जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण कसे करते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात हृतिक(Hrithik Roshan) आणि दीपिका ( Deepika Padukone) व्यतिरिक्त अनिल कपूर(Anil Kapoor), अक्षय ओबेरॉय आणि करण सिंग ग्रोव्हर देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 250 कोटींची कमाई केली आहे.(हेही वाचा: Bhaiyya Ji Teaser Released: मनोज बाजपेयी स्टारर 'भैय्या जी' या चित्रपटाची पहिली झलक समोर, 24 मे रोजी होणार प्रदर्शित (व्हिडिओ पहा))
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2024 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

