ज्येष्ठ सिनेअभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे आज (21 जानेवारी) निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले आहे. अंबर कोठारे यांनीही नाटकांमध्ये अभिनयासोबतच त्यांच्या निर्मितीचं काम केले आहे. आज त्यांच्यावर बोरिवलीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
पहा कोठारे कुटुंबीयांची पोस्ट
? स्व. श्री. अंबर कोठारे (१४.०४.१९२६ - २१.०१.२०२३) - संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना ?? pic.twitter.com/TrVq2Vx10R
— Mahesh Kothare (@maheshkothare) January 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)