Border 2: बॉर्डर 2 चित्रपटाचे चित्रीकरण झाशीत झाले सुरु, प्रदर्शनाच्या तारखेवरही शिक्कामोर्तब
बॉर्डर हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. दरम्यान, बॉर्डर2 ची प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'बॉर्डर २' चित्रपटाचे चित्रीकरण झाशीत सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे वरुण धवन देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. भूषण कुमार, निधी दत्ता, शिव चनाना आणि बिनॉय गांधी हे या चित्रपटाशी सह-निर्माते म्हणून जोडलेले आहेत, तर अनुराग सिंग चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
Border 2: बॉर्डर हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. दरम्यान, बॉर्डर2 ची प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'बॉर्डर २' चित्रपटाचे चित्रीकरण झाशीत सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे वरुण धवन देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. भूषण कुमार, निधी दत्ता, शिव चनाना आणि बिनॉय गांधी हे या चित्रपटाशी सह-निर्माते म्हणून जोडलेले आहेत, तर अनुराग सिंग चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सनी देओल आणि वरुण धवनसह अनेक जण दिसत आहे.
येथे पाहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)