Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विकी कौशल, कतरिना कैफ आणि वऱ्हाडी जयपूरहून सवाई माधोपूरला रवाना; उद्यापासून सुरु होणार लग्नाचे विधी (See Video)

विकी कौशल आणि कतरिना कैफ व इतर वऱ्हाडी जयपूरला पोहचले असून, आता ते रस्ता मार्गाने चौथ का बरवारा सवाई माधोपूरला रवाना झाले आहेत

Vicky Kaushal & Katrina Kaif (Photo Credits: Instagram)

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. राजस्थानमधील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये 9 डिसेंबरला या दोघांचे लग्न होणार आहे. आज संध्याकाळी दोघेही आपापल्या कुटुंबासह लग्नासाठी राजस्थानला रवाना झाले. नुकतेच या दोघांचे फोटो समोर आले होते, ज्यात कतरिना पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ व इतर वऱ्हाडी जयपूरला पोहचले असून, आता ते रस्ता मार्गाने चौथ का बरवारा सवाई माधोपूरला रवाना झाले आहेत. उद्यापासून लग्नाचे समारंभ आणि विधी सुरु होतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now