The Fame Game Trailer: झगमगाटी विश्वामागचं काळं सत्य समोर येणार! 'द फेम गेम'मधून माधुरी दीक्षितच डिजिटल जगात पदार्पण

माधुरी दीक्षित अनामिका आनंदची भूमिका साकारत आहे, जी व्यवसायाने अभिनेत्री आहे.

The Fame Game (Photo Credit - YouTube)

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेटफ्लिक्स (Netflix) वेब सीरिज 'द फेम गेम'द्वारे (The Fame Game) डिजिटल जगात पदार्पण करणार आहे. अशा परिस्थितीत या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आदल्या दिवशी, माधुरीने घोषणा केली होती की द फेम गेमचा ट्रेलर 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. त्याचवेळी माधुरीने सोशल मीडियावर तिच्या या सिरीजचा टीझरही शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने 'अनामिका आनंद' आणि तिच्या आयुष्याची झलक दाखवली. माधुरी दीक्षित अनामिका आनंदची भूमिका साकारत आहे, जी व्यवसायाने अभिनेत्री आहे. 25 फ्रेबुवारीला ही वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)