Vivek Agnihotri Tweet: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना निमंत्रण असून देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राहणार गैरहजर, व्यक्त केला खेद

फक्त प्रभु श्रीराम यांना माहिती आहे की, मला यावेळी किती दु:ख होतंय. असं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.

Vivek Agnihotri (PC - Instagram)

अयोध्येत (Ayodhya) नव्याने बांधल्या जात असलेल्या मंदिरात सोमवारी (22 जानेवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) केली जाणार आहे. संपूर्ण देशभर या सोहळ्याची चर्चा आहे. द कश्मीर फाइल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. पण, काही कारणास्तव ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीयेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.  22 तारखेला मी भारतात नाही, त्यामुळं या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मी जाऊ शकणार नाहीये. फक्त प्रभु श्रीराम यांना माहिती आहे की, मला यावेळी किती दु:ख होतंय. असं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)