Ek Villain Returns चा फर्स्ट लूक प्रदर्शित, 'या' दिवशी थिएटरमध्ये होणार रिलीज

जॉन अब्राहम, (John Abraham) अर्जुन कपूर, (Arjun Kapoor) दिशा पटानी (Disha Patani) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील स्टार्सचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

Ek Villain Returns (Photo Credit - Twitter)

जॉन अब्राहम, (John Abraham) अर्जुन कपूर, (Arjun Kapoor) दिशा पटानी (Disha Patani) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील स्टार्सचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या टीझर पोस्टरमधील प्रत्येकाचा लूक सस्पेन्सने भरलेला आहे. या चित्रपटाचा भाग एक 'एक व्हिलन' 8 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. पहिला भाग सुपरहिट झाल्यापासून चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित व्हावा, अशी चाहत्यांची इच्छा होती. लोकांची ही इच्छा निर्माते दुप्पट मनोरंजनाने पूर्ण करणार आहेत. हा चित्रपट मोहित सूरीच्या दिग्दर्शनाखाली बनत आहे. टी-सीरीज आणि बालाजी टेलिफिल्म्स संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट 29 जुलै 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Suri (@mohitsuri)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now