Tadap Teser: 'तडप'चा टिझर रिलीज, बघुन घ्या अहान शेट्टीचा नवीन लुक

प्रक्षेकांना चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक करण्यासाठी, निर्मात्यांनी एक टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये अहान शेट्टी आणि तारा सुतारियाची (Tara Sutaria) झलक दिसत आहे.

Tadap Teser: 'तडप'चा टिझर रिलीज, बघुन घ्या अहान शेट्टीचा नवीन लुक
Tadap Movie Poster (Photo Credit - Instagram)

सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले असले तरी आता त्याच्या मुलाची म्हणजे अहान शेट्टीची वेळ आली आहे. 'तडप' (Tadap) या चित्रपटातून अहान शेट्टी (Ahan Shetty) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सुनील शेट्टीचे चाहते त्याच्या मुलाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. दरम्यान, चाहत्यांना चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक करण्यासाठी, निर्मात्यांनी एक टिझर शेअर केला आहे, ज्यामध्ये अहान शेट्टी आणि तारा सुतारियाची (Tara Sutaria) झलक दिसत आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच बुधवारी प्रदर्शित होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2021 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).