Dahaad Trailer: Sonakshi Sinha आणि Vijay Verma स्टारर क्राइम-ड्रामा वेब सिरीज 'दहाड'चा ट्रेलर रिलीज (Watch Video)

'दहाड'मध्ये सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), विजय वर्मा, (Vijay Verma) गुलशन देवैया आणि सोहम शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'दहाड'चा ट्रेलर खूपच रोमांचक आहे, ज्याची सुरुवात अतिशय तणावपूर्ण वातावरणात होते.

Dahaad Trailer

प्राइम व्हिडिओने आज त्याच्या आगामी क्राईम-ड्रामा सीरिज 'दहाड'चा (Dahaad Trailer) ट्रेलर रिलीज केला. रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी बनवलेल्या या सिरिजचे दिग्दर्शन रुचिका ओबेरॉयसह कागतीने केले आहे. 'दहाड'मध्ये सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), विजय वर्मा, (Vijay Verma) गुलशन देवैया आणि सोहम शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'दहाड'चा ट्रेलर खूपच रोमांचक आहे, ज्याची सुरुवात अतिशय तणावपूर्ण वातावरणात होते. स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये, अंजली भाटी आणि सहकारी पोलिस मोकळेपणाने फिरत असलेल्या अज्ञात सिरीयल किलरचा शोध घेताना दिसतात. अंजली भाटीची भूमिका सोनाक्षी सिन्हाने केली आहे. रहस्यमय पद्धतीने महिला बेपत्ता होण्याच्या घटनांनंतर गुन्हेगार शोधण्याची मोहीम सुरू होते. अंजली भाटी यांच्याकडे खूप कमी वेळ आहे कारण ती एका निष्पाप महिलेचा जीव जाण्याआधी पुरावे एकत्र करण्याचा आणि गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्न करते.

पहा ट्रेलर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement