Shubhman Gill With Sara Ali Khan: स्टार क्रिकेटर शुभमन गिल दिसला सैफ अलीची मुलगी सारा अली खानसोबत, फोटो व्हायरल (See Photo)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन सध्या लंडनमध्ये आहे, जिथे तो बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत दिसत आहे.

शुभमन गिल (Photo Credit: Shubhman Gill/Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलचा नुकताच झालेला झिम्बाब्वे दौरा बऱ्यापैकी यशस्वी ठरला. त्या दौऱ्यात त्याने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या कामगिरीच्या जोरावर तो झिम्बाब्वे दौऱ्याचा ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ ठरला. दरम्यान, त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना वाटले की ही मुलगी सारा तेंडुलकर आहे, पण नंतर कळले की या मुलीचे नाव देखील सारा आहे, परंतु ती सचिन तेंडुलकरची मुलगी नसून अभिनेत्री सारा अली खान आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन सध्या लंडनमध्ये आहे, जिथे तो बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना दिसत आहेत. व्हायरल झालेला फोटो दुबईचा आहे, पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा लंडनचा फोटो असल्याचे म्हटले जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)